‘कजरा रे’ गाण्यावर अमृता फडणवीसांनी धरला ठेका; ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील व्हिडीओ व्हायरल

मुंबई:‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वालाही प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. वादग्रस्त असलेला हा शो घराघरात अतिशय आवडीने पाहिला जातो. नुकतंच या शोमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी पाहुणे कलाकार म्हणून हजेरी लावली. ‘बिग बॉस’च्या घरात अमृता फडणवीसांना पाहून सदस्यही आश्चर्यचकित झाले.अमृता फडणवीस यांचे मनोरंजन करण्यासाठी ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांनी डान्स सादर केले. अमृता देशमुख, प्रसाद जवादे आणि अक्षय केळकर यांनी ‘कजरा रे’ या गाण्यावर नृत्य केले. डान्समध्ये घरातील सदस्यांनी अमृता फडणवीस यांनाही सहभागी करुन घेतले. ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांसह ‘कजरा रे’ गाण्यावर अमृता फडणवीसांनी ठेका धरला.‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांसाठी अमृता फडणवीसांनी त्यांच्या सुरेल आवाजात खास गाणीही गायली. ‘मनिके मागे हिथे’ हे गाणं अमृता यांनी गायलं. तर घरातील महिला वर्गासाठी त्यांनी गायलेल्या ‘कुणी म्हणाले वेडी कुठली’ या गाण्यातील काही बोल त्यांनी म्हणून दाखविले. त्यांनी गायलेल्या या गाण्यांवर घरातल्या सदस्यांनीही ठेका धरत कार्यक्रमात रंगत आणली.

‘बिग बॉस’च्या पुढील भागात घरातील सदस्य अमृता फडणवीसांची मुलाखत घेणार आहेत. त्यामुळे अमृता फडणवीस मुलाखतीतून कोणते नवे खुलासे करणार, हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. अमृता फडणवीस या पेशाने बॅंकर असून उत्तम गायिकाही आहेत. त्यांनी अनेक गाण्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. दिवाळीनिमित्त त्यांच्या आवाजातील ‘लक्ष्मी आरती’ हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने