अदानींपाठोपाठ अंबानीही रात्री उशिरा 'मातोश्री'वर; भेटीत काय शिजतंय?

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांनी काल रात्री उशिरा उद्धव ठाकरेंची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी उद्योगपती गौतम अदानी यांनीही उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.रात्री साडेआठच्या सुमारास मुकेश अंबानींचे पुत्र अनंत अंबानी मातोश्रीवर दाखल झाले होते. त्यानंतर जवळपास साडे अकराच्या सुमारास ते तिथून बाहेर पडले. उद्धव ठाकरेंसोबत जवळपास तीन तास चर्चा झाली. यावेळी आदित्य ठाकरेही तिथे उपस्थित होते. यापूर्वी काही दिवसानंतर गौतम अदानी यांनीही उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर लगेचच झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, ही भेट घडत असतानाच काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर होते. यावेळी महायुतीच्या चर्चाही रंगल्या होत्या. ही भेट राज्याच्या राजकारणातली महत्त्वाची भेट मानली जात आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी आता अदानींपाठोपाठ अंबानींचीही भेट घेतल्याने या दोघांमध्ये नक्की काय शिजतंय याकडे आता राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने