रात्री उशीरा मातोश्रीवर लटके कुटुंबीयांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट.

 

मुंबई : उद्धव ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा पालिका प्रशासनाने अद्याप स्वीकारलेला नाही. राजीनामा दिल्याशिवाय कोणतीही निडणूक लढवता येत नसल्याने लटके यांची उमेदवारीवर टांगती तलवार आहे. अशातच लटके कुटुंबीयांनी रात्री उशीरा मातोश्रीवर जात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे चर्चेला उधाण आलं आहे. 

शासकीय नोकरीचा राजीनामा दिल्याशिवाय कोणतीही निडणूक लढवता येत नाही. याच कारणामुळे ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. असे असताना आता ऋतुजा लटके यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी पालिका प्रशासनाला राजीनामा मंजूर करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.दरम्यान, लटके कुटुंबीयांनी रात्री उशीरा उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. मात्र, दोघांमध्ये काय चर्चा झाली हे अद्याप कळलेलं नाही. दोघांचातील चर्चा गुलदस्त्यात आहे. तर दुसरीकडे अनिल परब यांच्या उपस्थित विलेपार्ल्यात बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये प्रमोद सावंत आणि कमलेश राय हेदेखील उपस्थित होते. अनिल परब यांनी घेतलेल्या बैठकीमुळे चर्चेला उधाण आलं आहे.अशातच, ऋतुजा लटके यांची जागा विश्वनाथ महाडेश्वर यांना देण्यासाठीच अनिल परब यांचा हा सगळा डाव असल्याचा गंभीर आरोप मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने