निवडणुकीच्या रिंगणात ठाकरेंचे दोन उमेदवार; काय आहे कारण?

मुंबई :  अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी काल उमेदवारीचा अर्ज दाखल केला. तर यांच्यासोबत आणि एका उमेदवाराने शिंदे गटाला धक्का देण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात निवडणुकीच्या रिंगणात ठाकरेंचे दोन उमेदवार का असा सवाल उपस्थित होत आहे. शुक्रवारी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी तर भाजप-बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून मुरजी पटेल यांनी उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे. तसेच, दिवंगत आमदार रमेश लटके यांचे निकटवर्तीय संदीप नाईक यांनीही अर्ज भरला आहे....तर दोन उमेदवार का?

माजी मंत्री, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी उपस्थित झालेल्या प्रश्नाच उत्तर दिलं आहे. . अर्ज भरल्यानंतर कुठलाही दगाफटका होऊ नये, या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं ही खबरदारी घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे.

निवडणुकीत हा एक नियम असतो. आयोगाच्या नियमानुसार एबी फॉर्ममध्ये पर्यायी उमेदवाराचं नाव समाविष्ट करता येऊ शकतं. अधिकृत उमेदवारानं काही कारणास्तव माघार घेतल्यास किंवा छाननीत त्याचा अर्ज बाद झाल्यास दुसरा उमेदवार अधिकृतरित्या जाहीर केला जातो. त्याच अनुषंगाने संदीप नाईक यांनी आज उमेदवारी अर्ज भरला आहे. कोणत्याही प्रकारचा ठाकरे गटाला दगाफटका होऊ नये, याची खबरदारी घेत शिवसेनेकडून दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने