अनिल देशमुखांचा तुरुंगवास वर्षभरातच संपणार?

 मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचा तुरुंगवास लवकरच संपण्याची शक्यता आहे. कसं काय? तर ते समजून घेऊयात ११ महिन्यांच्या तुरुंगवासानंतर ईडीच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात अनिल देशमुखांना मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणातील पुराव्यांचा विचार करता देशमुखांना याप्रकरणी दोषी ठरवलं जाऊ शकत नाही, असं मत मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करताना नोंदवलं आहे.


 आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपांप्रकरणी अंमलबजावणी संचलनालय म्हणजेच ईडीनं देशमुखांविरोधात गुन्हा नोंदवला होता. याचप्रकरणी निजामुद्दीन जमादार या न्यायमूर्तींनी देशमुखांना जामीन मंजूर केला. त्यामुळे आता याच जामीनाच्या आधारावर अनिल देशमुखांचे वकील त्यांना सीबीआय प्रकरणातही जामीन मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी विशेष सीबीआय न्यायालयात जामीन अर्ज केला आहे. त्यावर कधी सुनावणी होणार, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने