‘टायगर ३’ च्या प्रदर्शनाचा मुहूर्त बदलला, ईद नव्हे तर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित.

 मुंबई : अभिनेता सलमान खानचे आगामी चित्रपट खूप चर्चेत आहेत. गेले अनेक महिने त्याचे चाहते ‘टायगर ३’ची वाट पाहत आहेत. सलमान त्याचे चित्रपट प्रामुख्याने ईदला प्रदर्षित करतो. त्यामुळे २०२२ च्या ईदला ‘टायगर ३’ प्रदर्शित होईल असे बोलले जात होते. मात्र, यावर्षी हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. आता या चित्रपटाबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे आता हा चित्रपट ईदला नव्हे तर एका दुसऱ्या सणाला प्रदर्शित केला जाणार आहे.


दिवाळीपूर्वीच सलमान खानने मोठी घोषणा केली आहे. त्याने त्याचा आगामी चित्रपट ‘टायगर ३’ ची नवीन रिलीज डेट जाहीर केली आहे. ‘टायगर ३’ पुढील वर्षी एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार होता पण आता त्याच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. सलमान खानने ‘टायगर ३’ मधील नवीन लूक शेअर करताना ही माहिती दिली आहे. सलमानचा ‘टायगर ३’ हा चित्रपट पुढच्या वर्षी दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. ‘टायगर’ फ्रेंचायझीच्या तिसऱ्या भागात सलमान खानबरोबर अभिनेत्री कतरिना कैफही दिसणार आहे. या दोघांच्या जोडीला प्रत्येक वेळी प्रेक्षकांचे प्रेम मिळाले आहे आणि यावेळीही चाहते या दोघांना एकत्र पाहण्यासाठी फार उत्सुक आहेत. ‘टायगर ३’ मधून समोर आलेल्या नव्या लूकमध्ये सलमान खानचे फक्त डोळे दिसत आहेत.

अनेक वर्षांपासून ईदला सलमान खानचा चित्रपट पाहायला मिळतो. पण गेल्या वर्षी कोरोनामुळे चित्रपटगृहे बंद असल्याने प्रेक्षकांना सलमानचा चित्रपट पाहता आला नाही. तसेच यंदाच्या ईदलाही सलमानने त्याचा चित्रपट प्रदर्शित केला नाही. त्यामुळे पुढच्या वर्षी ईदला ‘टायगर ३’ प्रदर्शित होणार असे त्याच्या चाहत्यांना वाटत होते. पण पुढील वर्षीच्या ईदलाही सलमान हा चित्रपट प्रदर्शित करणार नसल्याने चाहत्यांची थोडी निराशा झाली.आता अखेर ‘टायगर ३’ हा चित्रपट पुढील वर्षी दिवाळीला प्रदर्शित करण्याचा निर्णय त्याने त्यांनी घेतला आहे. सध्या तरी निर्मात्यांनी ‘टायगर ३’च्या प्रदर्शनाची तारीख बदलण्याचे कारण स्पष्ट केले नसले तरी सलमानचे आधीचे चित्रपट अपयशी झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची कुजबुज सोशल मीडियावर सुरु झाली आहे. तर काही जण या चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनचे काम राखडल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने