“… म्हणून तू काही झुलन गोस्वामी होणार नाहीस” व्हायरल फोटोंवरून नेटकऱ्यांनी अनुष्काला केलं ट्रोल

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. अनुष्काने आतापर्यंत बरेच हिट चित्रपट दिले आहेत. पण मागच्या बऱ्याच काळापासून ती मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मुलीच्या जन्माच्या वेळी ब्रेकवर गेलेली अनुष्का शर्मा लवकरच मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. सध्या ती तिचा आगामी चित्रपट ‘चकदा एक्सप्रेस’च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे आणि या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून या फोटोंमुळे अनुष्काला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं जात आहे.

अनुष्का शर्मा मागच्या काही दिवसांपासून कोलकातामध्ये ‘चकदा एक्सप्रेस’चं शूटिंग करत आहे. अनुष्का शूटिंग करत असताना चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. ज्यात अनुष्का शर्मा सफेद शर्ट आणि लाल रंगाच्या स्कर्टमध्ये हातात बॅट पकडून उभी असलेली दिसत आहे. या फोटोंमध्ये झुलन गोस्वामीच्या लुकमध्ये असलेल्या अनुष्काचे केस शॉर्ट असलेले दिसत आहेत.


अनुष्का शर्माने झुलन गोस्वामीच्या व्यक्तिरेखेसाठी खूप मेहनत घेतली आहे. ही व्यक्तीरेखा उत्तम पद्धतीने साकारण्यासाठी तिने शक्य ते सर्व प्रयत्न केले आहेत. अलिकडेच एका मुलाखतीत अनुष्काचा पती विराट कोहलीने सांगितलं होतं की अनुष्काला सुरुवातीला गोलंदाजी करताना समस्या येत होत्या कारण ती पहिल्यांदाच एका खेळाडूची भूमिका साकारत आहे. पण तिच्या स्किल्स पाहून तो खूप खुश आहे.आपल्या आगामी चित्रपटासाठी अनुष्का बरीच मेहनत घेत आहे. पण आता या व्हायरल फोटोंमुळे ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. मागच्या वेळीही अनुष्काच्या काही व्हायरल फोटोंवरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं होतं. अनुष्काने झुलन गोस्वामीची भूमिका साकारणं नेटकऱ्यांचा पसंतीस पडलेलं नाही. त्यामुळे ते तिला सातत्याने ट्रोल करताना दिसत आहे. आता तर काहींना तिला, “फक्त हातात बॅट घेतली म्हणून तू झुलन होणार नाहीस” असंही म्हटलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने