शिंदे वेळ पाळत नाहीत म्हणून फडणवीस रुसले? मतभेद चव्हाट्यावर

मुंबई :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघे सरकार स्थापनेपासून सतत एकत्र दिसून आले आहेत. सातत्याने प्रत्येक कार्यक्रमात, बैठकीत, दौऱ्यांवर एकमेकांसोबत असलेले पाहायला मिळाले. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात मतभेद असल्याचं समोर येत आहे. दोघे एकमेकांसोबत एकाच मंचावर येणं टाळत असल्याचं आढळून आलं आहे.रविवारी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे तीन कार्यक्रम एकत्र होते. मात्र एकाही कार्यक्रमाला हे दोघे एकत्र आले नाहीत. हे कार्यक्रम टाळून मुख्यमंत्री शिंदे ठाण्यातल्या एका पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला गेले. दिवसभर ते तिथेच होते. पुढे देवेंद्र फडणवीस ठाण्यातल्या एका कार्यक्रमाला आले. तिथेही एकनाथ शिंदे ठाण्यात असून गेले नाहीत. त्यामुळे यांच्यातल्या मतभेदांची चर्चा आहे.

शनिवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांच्यात वर्षावर बैठक झाली. या बैठकीत पोलिसांच्या बदल्यांविषयी चर्चा झाली. त्यामध्ये या दोघांमध्ये वाजल्याची चर्चा आहे. सरकार येऊन आता शंभरहून अधिक दिवस लोडले. पण तरीही अजून अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा प्रश्न सुटला नाही, तसंच मुख्यमंत्री वेळ पाळत नाहीत, या मुद्द्यांवरुन देवेंद्र फडणवीस नाराज असल्याचं सांगितलं जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने