गांगुली अध्यक्षपद सोडणार; वर्ल्डकप विजेत्या संघातील माजी खेळाडू रेसमध्ये

 मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ला नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने 2019 मध्ये अध्यक्षपदाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. मात्र आता ते पद सोडणार आहे अशी माहिती मिळत आहे. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत राज्य संघटनांच्या प्रतिनिधिंची यादी आली आहे. यामध्ये काही आश्चर्यकारक नावांचा समावेश आहे. या यादीतील काही व्यक्ती या बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. यात भारताचे माजी खेळाडू रॉजर बिनी यांचादेखील समावेश आहे.टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने