कोल्हापूर अर्बन बॅंकेसाठी १३ नोव्हेंबरला मतदान

 कोल्हापूर : दि कोल्हापूर अर्बन को. ऑप बॅंकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर झाला आहे. बॅंकेसाठी १३ नोव्हेंबरला मतदान, तर १५ नोव्हेंबरला मतमोजणी आहे. यासाठी २८ हजार सभासद सकाळी आठ ते सायंकाळी पाच दरम्यान मतदान करतील. जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया उद्या (ता. ७) ते बुधवारी (ता. १२) पर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ दरम्यान मध्यवर्ती बसस्थानक परिसरात असणाऱ्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आहे.राज्यात महापूर, अतिवृष्टीमुळे पुढे ढकललेल्या निवडणुकांवरील स्थगिती उठली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल चार हजार सहकारी संस्था, बॅंका, पतसंस्था, जिल्हा व तालुका संघ, साखर कारखान्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. कोल्हापूर अर्बन बॅंकेच्या पुणे, कोल्हापूर व रत्नागिरी येथे शाखा आहेत. कोट्यवधी रुपयांच्या ठेवी आहेत. गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांनी बॅंक चर्चेत आहे. बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेल्या मारहाणीचा मुद्दाही या निवडणुकीत येऊ शकतो.

निवडणूक कार्यक्रम असा
अर्ज दाखल - ७ ते १२ ऑक्‍टोबर (सकाळी ११ ते दुपारी ३)
अर्ज छाननी - ता. १३ - दुपारी १२ पासून
पात्र उमेदवारांची यादी - ता. १४, दुपारी एक
अर्ज माघारी - ता. १४ ते २८ ऑक्‍टोबर, सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत
चिन्ह वाटप - ता. ३१, सकाळी ११ वाजता
मतदान - ता. १३ नोव्हेंबर, सकाळी ८ ते सायंकाळी ५
मतमोजणी व निकाल - ता. १५, सकाळी आठपासून

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने