घरामध्येच सगळ्यांसमोर टीना दत्ताने ‘त्या’ व्यक्तीला घट्ट मिठी मारली अन्…; व्हिडीओ पाहून प्रेक्षकांचा राग अनावर.

 

मुंबई : ‘बिग बॉस १६’ शो सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहे. या शोमध्ये ताजिकिस्तानचा छोटा गायक अब्दू रोजिकही सहभागी झाला आहे. अब्दूला प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळत आहे. फक्त अठरा वर्षांचा हा गायक आणि त्याची गाणी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतात. सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामध्येही तो काम करताना दिसणार आहे. ‘बिग बॉस १६’ची स्पर्धक टीना दत्ताला अब्दूल फार आवडतो. याचीच आता चर्चा सुरु झाली आहे.

अब्दू आपल्याला आवडत असल्याचं टीनाने शोच्या पहिल्या आठवड्यामध्येच सांगितलं होतं. त्याच्या जवळ जाण्याची एकही संधी टीना सोडत नाही. मंगळवारी प्रसारित झालेल्या भागामध्ये अब्दू स्वयंपाकघराजवळ बसलेला असतो. टीना तिथेच काम करत असते. तिथे अब्दूला पाहून टीनाला वाटतं तो आपली साथ देण्यासाठी इथे बसला आहे.अब्दू स्वयंपाकघराजवळ आपल्यासाठीच बसला आहे असं समजून ती त्याला घट्ट मिठी मारते. तुझ्या जवळ आल्यास एक वेगळ्याच प्रकारचा सुगंध येतो. टीना जेव्हा अब्दूला मिठी मारते तेव्हा तो तिच्यापासून सुटका व्हावी याचा प्रयत्न करतो. तसेच तू मला अगदी घट्ट पकडलं आहेस असंही म्हणतो.टीना आपल्याशी जे वागत आहे ते त्याला अजिबात आवडत नाही आणि तो तिथून उठूनच निघून जातो. टीनाच्या या वागण्यावरून तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. हे एका मुलाने केलं असतं तर वाद झाले असते, अब्दू लहान मुलगा नाही हे टीनाने समजलं पाहिजे अशा अनेक कमेंट प्रेक्षकांनी केल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने