सलमान खान दाखवणार साजिद खानला घरचा रस्ता !

मुंबई : बिग बॉस हा टिव्हीवरील कंन्ट्रोवर्शियल शो आहे ज्यात अशाच लोकांचा सामावेश असतो. या घरात नेहमी वाद विवाद होतात आणि या वादातुन लोकांचे मनोरंजन होत असते. मात्र यंदाच्या सिझनमध्ये जरा वेगळच चित्र पहायला मिळतंय. बिग बॉस 16 च्या सीझनमध्ये घरात तर वाद होतचं आहे पण त्यापेक्षा जास्त वाद बाहेर झालायं. त्याचं कारण आहे, या शो मधील स्पर्धक साजिद खान . याच वाढत जाणाऱ्या वादामूळे साजिद खानला आता या शोमधून बाहेर जावे लागणार आहे.त्याने या शोमध्ये एंट्री केली आणि ४ वर्षांपूर्वी त्यांच्यावर लावण्यात आलेले लैंगिक शोषणाच्या आरोपांना पुन्हा उधाण आलं. त्यांचा बिग बॉस मधील सहभाग अनेकांना आवडला नाही आणि त्यामूळे या शोचे  निर्माते आणि होस्ट सलमान खान यांच्यावर जोरदार टीका होत आहे. अनेक नामवंत व्यक्तींनी त्याला या शोमधून बाहेर काढण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांचा रोष आणि साजिदवर होणारे गांभीर आरोप यांच्यामुळे या शोच्या निर्मात्यांवर त्याला ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर काढण्यासाठी दबावाचे वातावरण निर्माण झाल्याचे बोलले जात होते. सर्व बाजूंचा विचार करुन‘बिग बॉस’च्या निर्मात्यांनी साजिद खानबद्दल हा निर्णय घेतला आहे.त्यामुळे एका  आठवड्याच्या आतच साजिदला शोच्या बाहेर काढले जाऊ शकते महत्वाचे म्हणजे सलमान खानने देखील निर्मात्यांच्या या निर्णयाला सहमती दर्शवल्याचे सांगितले जात आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने