चक्क वाघ बकरी एकसाथ, अपूर्वा आणि विकासमध्ये नवं नातं?

मुंबई :  बिग बॉस मराठीच्या घरात भांडण, राडा हे तर होतंच पण या घरात प्रेम, मैत्री आणि नात्याचे बंधही विणले जातात. त्यामुळे वाद, भांडण यासोबत नात्यातला गोडवाही प्रेक्षकांना पाहायला आवडतो. अशीच काहीशी थट्टा मस्करी आजच्या भागात पाहायला मिळणार आहे. गेली दोन आठवडे महेश सरांच्या रडारवर असलेली आणि कायम घरात वरच्या पट्टीत बोलणारी अपूर्वा नेमळेकर चक्क गोड गोड बोलत विकासची थट्टा करताना दिसणार आहे..

या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच अपूर्वाच्या वागण्यात थोडासा बदल दिसतो आहे. अपूर्वाने आपला राग बाजूला सारून सगळ्यांशी जुळवून घ्यायच ठरवलेलं दिसत आहे. कालपासून तर (bigg boss marathi) घरामध्ये अपूर्वा आणि विकासची नोकझोक दिसून येतं आहे. काल देखील अपूर्वाने विकासला बजावले जर मला तुझ्याविषयी काही चुगली आली तर मी आहे आणि तू आहे... माझ्यासारखी वाईट कोणी नाही... अर्थात हे ती मस्करीमध्ये बोलली.आजपण दोघांमध्ये मजेशीर गप्पा बघायला मिळणार आहेत. अपूर्वाने विकासला सांगितले’ “पुढच्या वेळेस मी जी पण ड्युटी घेईन ती नाही घेतलीस तर मी तुझे आभार मानेन”. विकासचे त्यावर म्हणणे आहे "जेवण मग ... ? त्यावर अपूर्वाने बजावले, "विचार पण नाही करायचा. मी खरंच सांगते माझ्याबरोबर किचन नाही घ्यायचा. मी अशी सुगरण नाहीये... मी आधीच सांगते आहे. विकास मित्रा मला खात्री आहे एक दिवस टास्कमध्ये तू मला पण उचलशील. या घरात कुठलाही पुरुष उचलू नाही शकला, तरी तू मला उचलशील... ज्याअर्थी तू माझी बॅग उचलीस त्याअर्थी...” विकास म्हणाला, “मला पण वाटतं आहे...” त्यावर अपूर्वाने विकासाला अपूर्वा भन्नाट उत्तर देते. ती म्हणते,"पण हि संधी मी तुला देणार नाही." हे ऐकताच सगळयांना घरात हसू फुटले. ही थट्टा मस्करी प्रेक्षकांना कधी वाटणार हे आज कळेलच.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने