फक्त मारामारीच व्हायची राहिली बाकी, अमृता-यशश्रीमध्ये जुंपली

मुंबई :  बिग बॉस मराठी सिझन ४ सुरु होऊन जस-जसे दिवस पुढे जात आहेत तस-तसे घरातील सदस्यांचे नवनवीन रंग समोर येत आहेत. सुरुवातीला अगदीच मिळमिळीत वाटणारे सदस्यही तोफ बनताना दिस आहेत. नुकताच घरातील पहिला सदस्य बाहेर पडला आहे. गेल्या एपिसोडमध्ये निखिल राजेशिर्कला बिग बॉसचं घर सोडावं लागलं. आणि आता पुन्हा घरात आणखी एका सदस्याला बाहेर काढण्यासाठी नॉमिनेशन प्रक्रिया पार पडत आहे

यावरनंच आता सुरु झाला आहे राडा. मुला-मुलांमध्ये नाही तर घरात नेहमीच दुसऱ्यांच्या छत्रछायेखाली वावरत आहेत अशा वाटणाऱ्या, साध्या-भोळ्या दिसणाऱ्या अमृता देशमुख आणि यशश्री मध्ये कडाक्याचं भांडण रंगलं, अगदी नळावर भांडतात तशा दोघी भांडताना दिसल्या. सध्या तो भांडणाचा प्रोमो जोरदार व्हायरल होत आहे. चला,जाणून घेऊया याविषयी थोडं सविस्तर.बिग बॉस मराठीच्या घरामधून काल निखिल राजेशिर्केला बाहेर जावे लागले. आज घरामध्ये पार पडणार आहे “फटा पोश्टर निकला झिरो” हे नॉमिनेशन कार्य. सदस्य या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये कोणाला नॉमिनेट करणार ? आणि कोणाला सेफ ? कोण घराबाहेर जाईल ? हे कळेल लवकरच. यशश्री अमृता देशमुखला नॉमिनेट करणार असून त्यावर दोघींमध्ये कडाक्याचे भांडणं होताना दिसणार आहे.अमृता देशमुखनं चढ्या आवाजात यशश्रीला म्हटलं, "स्वतः काहीतरी विक्षिप्तासारखं वागायचं..., ज्या लोकांच्या जीवावर उड्या मारते आहेस ना..., आता एवढं सगळं ऐकल्यावर यशश्री कशाला गप्प बसतेय. तिनंही कचाकचा बोलत उत्तर दिलंच, “मी इथे तुला प्रूफ करायला आले नाहीये, मी कोणाच्या जीवावर उड्या मारत नाहीये.'

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने