प्रसाद सतत भांडतोय? की त्याला मुद्दाम केलं जातंय टार्गेट?

 मुंबई : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित बिग बॉस मराठीचे चौथे पर्व 2 ऑक्टोबर रोजी सुरू झाले. ‘बिग बॉस’च्या तीन हिट पर्वानंतर सर्वचजण चौथे पर्व कधी सुरू होणार याची वाट पाहत होते. अखेर रविवारी 16 स्पर्धकांनी घरात प्रवेश केला. पण पहिल्याच दिवसापासून बिग बॉसच्या घरात वादाची ठिणगी पडलेली दिसली. आणि या वादाच्या तोंडाशी होते प्रसाद जवादे आणि अपूर्वा नेमळेकर. त्या दिवसापासून सुरू झालेलं हे वादाचं सत्र अजूनही थांबलेलं नाही. किंबहुना रोज नवा वाद निर्माण होत आहे. पण यामध्ये प्रत्येकाशी होणाऱ्या भांडणात प्रसाद हे नाव कॉमन आहे. त्यामुळे प्रसाद सगळ्यांशीच भांडतोय की त्याला मुद्दाम टार्गेट केलं जातंय. असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आल्यापासून प्रसादला सदस्यांकडून कुठल्या न कुठल्या गोष्टीवरून ऐकावं लागतं आहे, मग ते अपूर्वा आणि त्याच्यामध्ये झालेलं भांडणं असो वा अक्षय आणि त्याच्यामध्ये झालेला वाद असो वा तेजस्विनी आणि त्याच्यामध्ये कामावरून झालेली बाचाबाची असो. घरातील काही सदस्यांनी प्रसादला सांगितले देखील जर सगळं घरं तुला काही सांगतं असेल तर नक्कीच तुझं काहीतरी चुकत असावं.. पण प्रसादही प्रत्येकाला तोडीस तोंड उत्तर देत असल्याने हा वाद वाढतच आहे.
आता नेमकं घरातील काही सदस्य त्याला टार्गेट करत आहे कि त्याचं काही खरंच चुकतं आहे हे लवकरच कळेल.नुकत्याच घडलेल्या भागात अक्षय आणि प्रसादमध्ये शाब्दिक चकमक झाली. पोळ्या करण्यावरून त्यांच्यामध्ये वाद झाले. रात्रीच्या जेवणात चपाती करायची का नाही, या मुद्द्यावरून दोघांमधला वाद वाढत गेला. अक्षय म्हणाला, सांगकाम्या शब्दाचा अर्थ ऐक त्यावर प्रसाद म्हणाला नाही ऐकत जा... अक्षय पुढे म्हणाला, शिस्तीत सांगतो आहे, शिस्तीत बोलायला कधी शिकणार आहेस. प्रसादचे म्हणणे पडले “तू ज्यादिवशी शिस्तीत सांगशील त्यादिवशी”. पुढे या वादात अपूर्वानेही उडी घेतली. त्यामुळे हा वाद आणखीनच पेटला. त्यामुळे आज काय होणार हहे बघण्यासारखे आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने