लोकांनी अब्दूला 'कचरा' म्हटलं, पण त्याने एकाच उत्तरात सगळ्यांची...

  मुंबई : बिग बॉस १६ च्या घरातील एक सदस्य सध्या सगळ्यांचेच मन जिंकण्यात यशस्वी होतोय. सलमान खान च्या या चॅट शो मध्ये अब्दूनं पहिल्या दिवसांपासून सगळ्यांच्या मनात घर बनवलंय. अब्दू रोझिक १९ वर्षांचा आहे,पण कमी वयात असलेला त्याच्यातील समजूतदारपणा सगळ्यांनाच हैराण करुन सोडतोय. छोट्या उंचीच्या लहानग्या अब्दूचा आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहण्याचा दृष्टिकोन चाहत्यांना त्याच्या प्रेमात पाडायला मजबूर करतोय. गेल्या एपिसोडमध्ये अब्दूनं रॅपर एमसी स्टॅनला आपल्या अनुभवातून आलेल्या ज्ञानानं खूपच प्रेरित केलेलं दिसून आलं.एमसी स्टॅन आणि अब्दू रोझिक दरम्यान खूप मजेदार असे क्षण बिग बॉसच्या घरात पहायला मिळाले. बिग बॉसच्या घरात सध्या रॅपर एमसी स्टॅन खूप अस्वस्थ वाटतोय. तो कुठल्याही अॅक्टिव्हिटीमध्ये खूप कमी सहभाग घेताना दिसत आहे. या आठवड्यात एमसी स्टॅनला एलिमिनेट देखील करण्यात आलं आहे. स्वतःला एलिमिनेशनपासून वाचवण्यासाठी बिग बॉसने एक संधी त्याला दिली होती. पण रॅपरला त्या संधीचा फायदा घेता आलेला नाही. आणि तो आता खूप नाराज आहे आणि शो मधून आपण बाहेर पडू असं देखील त्याला वाटत आहे. त्याचवेळी अब्दू रोझाक त्याच्याजवळ जातो आणि त्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करताना दिसतो.

पण एमसी स्टॅनला प्रोत्साहित करता करता अब्दू अचानक भावूक होतो. तो म्हणतो,''सोशल मीडियावर त्याला आधी खूप ट्रोल केलं जायचं. खूप हीन दर्जाच्या कमेंट्स त्याला आजही मिळतात. पण असं असून देखील तो खूप सकारात्मक मनःस्थितीत राहण्याचा प्रयत्न करतो. आयुष्याकडे त्याच्या पाहण्याचा दृष्टिकोन तो कधीच नकारात्मक ठेवत नाही''. अब्दू पुढे म्हणाला, ''मला कुणी कचरा म्हणायचं,खूप घाणेरड्या भाषेत लोक माझ्यासाठी कमेंट करायचे. पण याच सगळ्या गोष्टी मला आणखी स्ट्रॉंग बनवतात''.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने