शिवसेना फोडायची तयारी अडीच वर्षांपासून; चंद्रकांत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई : दोन-अडीच वर्षांपासून आपलं सरकार येईल असे सांगत होतो, हे सांगायला मी काही वेडा नव्हतो. त्यासाठी योजना बनवत होतो, असा गौप्यस्फोट पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला.एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील सत्तांतरावर भाष्य केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातील 40 आमदार घेऊन भाजप पक्षासोबत सरकार स्थापन केलं. सध्या राज्यातील शिवसेना पक्षाचे दोन गट झाले असून उद्धव ठाकरे यांची साथ सोडून अनेक शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटामध्ये दाखल होत आहेत. अशातचं चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना पक्ष कधी फुटला यासंदर्भात खुलासा केला आहे.

दोन अडीच वर्षापासून आपलं सरकार येईल असे सांगत होतो. हे सांगायला मी काही वेडा नव्हतो. त्यासाठी योजना बनवत होतो, असे विधान पाटील यांनी यावेळी केलं. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला कार्यकर्त्यांना विश्वास द्यायचा होता. ४० जणांना बाहेर काढणे सोपे नव्हते. त्यासाठी वेळ लागणार होता. त्यासोबत तशी संधी येणेही महत्त्वाचे होते. शेवटी ती वेळ साधल्या गेली आणि आपले सरकार आणले, असा खुलासा भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने