आता Blue Tick साठी मोजावे लागणार पैसे? ट्विटर प्रतिमहिना ५ हजार रुपये आकारण्याची शक्यता

अमेरिका: अमेरिकेतील अब्जाधीश एलॉन मस्क यांनी ‘ट्विटर’ या समाजमाध्यम व्यासपीठाचा ताबा घेतल्यानंतर आगामी काळात ट्विटर या माध्यमामध्ये अनेक बदल होणार असल्याचे म्हटले जात आहे. मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेताच कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल आणि कायदा कार्यकारी अधिकारी विजया गाड्डे यांच्यासह चार अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. दरम्यान, ट्विटर वापरकर्त्यांच्या पडताळणी (व्हेरिफिकेशन) प्रक्रियेत सुधारणा करण्यात येत असल्याचे ट्वीट मस्क यांनी नुकतेच केले आहे. मस्क यांच्या या ट्वीटच्या पार्श्वभूमीवर ट्विटर वारकर्त्यांना Blue Tick साठी पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. तसा अंदाज व्यक्त केला जात आहे.टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार ट्विटरवर ब्ल्यू टीक हवे असल्यास वापरकर्त्यांना आता पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. याबाबतचे धोरण ठरवण्यासाठी ट्विटरकडून विचार केला जात आहे. या धोरणाची अंमलबजावणी झाल्यास वापरकर्त्यांना ‘ट्विटर ब्ल्यू’चे सबस्क्रीप्शन घ्यावे लागेल. त्यासाठी ट्विटर वापरकर्त्यांना महिन्याला ४.९९ डॉलर्स (४९३० रुपये) मोजावे लागतील. अन्यथा व्हेरिफाईट युजर्सचे ब्ल्यू टीक जाऊ शकते. अद्याप या धोरणावर शिक्कामोर्तब झालेले नाही.दरम्यान, ट्विटरची ‘ट्वीटर ब्ल्यू’ ही सबस्क्रीप्शनवर आधारित सुविधादेखील महागण्याची शक्यता आहे. ट्वीटर ब्ल्यू सबस्क्रीप्शन असणाऱ्या वापरकर्त्यांना ट्विटरकडून वेगवेगळे फीचर्स दिले जातात. यामध्ये ट्वीट एडीट करण्याचीही सुविधा असते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने