यंदाच्या दिवाळीत पहिल्यांदाच होणार शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यात टक्कर, जाणून घ्या कारण

मुंबई : शाहरुख खान आणि सलमान खान ही बॉलिवूडमधील दोन मोठी नावं. आतापर्यंत अनेक वैविध्यपूर्ण चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. या दोन्ही खान्सची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. या दोघांच्या आगामी चित्रपटांकडे कायमच प्रत्येकाचं लक्ष असतं. सलमान खान लवकरच ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात, तर शाहरुख खान ‘जवान’, ‘पठाण’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. अशातच यांच्या चाहत्यांसाठी एक उत्कंठावर्धक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे, पाहिल्यांदाच शाहरुख आणि सलमान यांच्यात टक्कर होणार आहे.

शाहरुख खान आणि सलमान खान गेले अनेक दिवस त्यांच्या आगामी चित्रपटाबद्दलच्या काही ना काही बातम्या शेअर करून चाहत्यांमधली उत्सुकता वाढवत आहेत. या दोघांच्याही आगामी चित्रपटांच्या सेटवरून काही बिहाईंड द सीन्स फोटो व्हायरल झाले होते. तसंच आपापल्या चित्रपटातील त्यांचे लुक्सही आउट झाले. त्यांच्या लुक्सने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. आता सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ आणि शाहरुखच्या ‘पठाण’ या चित्रपटाच्या टीझरच्या तारखा समोर आल्या आहेत.यंदाची दिवाळी शाहरुख आणि सलमानच्या चाहत्यांसाठी खूप खास असणार आहे कारण, ‘किसी का भाई किसी की जान’ आणि ‘पठाण’ या चित्रपटांचे पहिले टीझर या दिवाळीत प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही चित्रपटांचे टीझर एकाच दिवशी, म्हणजे २३ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे या शाहरुख आणि सलमानमची टक्कर पाहायला मिळणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने