‘कार्तिकेय २’मधील अभिनेत्याने दिला ‘नॉर्थ वि. साऊथ’ या वादाला पूर्णविराम; म्हणाला, “आपण एक उत्तम चित्रपट…”

मुंबई : आपल्याकडे आजही मूळ प्रवाहातील चित्रपट आणि प्रादेशिक चित्रपट यात फरक केला जातो. आता कुठे ही परिस्थिती नियंत्रणात येऊ लागली आहे, तरी कमर्शियल चित्रपटांसमोर प्रादेशिक चित्रपट दबले जातात हे सत्य नाकारून चालणार नाही. पण तरी काही चित्रपटांनी व्यावसायिक चित्रपटांना चांगलंच मागे टाकल्याचं आपण पाहिलं आहे. ‘द काश्मीर फाइल्स’च्या घवघवीत यशानंतर ‘कार्तिकेय २’ या चित्रपटाला अभूतपूर्व असं यश मिळालं. आमीरचा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर येऊन या चित्रपटाने आमीरच्या चित्रपटापेक्षा जास्त कमाई केली आणि बॉक्स ऑफिसवर एक वेगळा इतिहास रचला.



याच चित्रपटातील अभिनेता निखिल सिद्धार्थ यांच्याशी ‘टाइम्स नाऊ डिजिटल’ने संवाद साधला. यादरम्यान निखिल यांनी बऱ्याच गोष्टींवर भाष्य केलं. चित्रपटाच्या यशाबद्दल निखिल म्हणतात, “हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा ही आमची इच्छा होती. शिवाय श्रीकृष्णाचे भक्तदेखील बरेच आहेत, पण प्रेक्षक आमच्या चित्रपटाला एवढं डोक्यावर घेतील याचा मी कधीच विचार केला नव्हता.”

याच मुलाखतीमध्ये निखिल यांना नॉर्थ आणि साऊथ या वादाविषयी विचारलं गेलं तेव्हा निखिल यांनी त्यांचं मत अगदी स्पष्टपणे मांडलं. निखिल म्हणाले, “मला सगळ्या प्रकारचे चित्रपट पाहायला आवडतात. ‘अंदाज अपना अपना’, ‘कुछ कुछ होता है’ किंवा रजनीकांत यांचे चित्रपट मी आजही आवडीने बघतो आणि मला ते खूप आवडतात. प्रेक्षकसुद्धा चित्रपटप्रेमीच आहेत, त्यामुळे हा नॉर्थ-साऊथ वादाचा मुद्दा काही मोजक्या लोकांपुरता मर्यादित आहे. या वादात न पडता एक उत्तम चित्रपट कसा तयार करता येईल याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. आजच्या काळात सगळ्याच भाषेतील कलाकारांना प्रेक्षक भरपूर प्रेम देत आहेत आणि मी त्यापैकी एक आहे याचा मला प्रचंड आनंद आहे.’ब्रह्मास्त्र’ने तेलुगू भाषेत चांगला व्यवसाय केला, चित्रपट चांगला असेल तर प्रेक्षक तो पाहायला येतात, आणि जे वाद घालतात ते कधीच चित्रपटगृहाकडे फिरकत नाहीत.”

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने