गायक उदित नारायण यांना हृदयविकाराचा झटका? मॅनेजरने सांगितलं व्हायरल वृत्तांमागचं सत्य

 मुंबई : प्रसिद्ध गायक उदित नारायण यांना हृदयविकाराचा झटका आल्याची वृत्तं सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसत आहे. ज्यामुळे उदित नारायण यांचे चाहते हैराण झाले आहेत. ट्विटरवरही अशा आशयाचे मेसेज व्हायरल होताना दिसत होते. त्यामुळे चाहत्यांचा एकच गोंधळ उडाला. नेमकं सत्य काय? उदित नारायण यांची तब्येत खरंच बिघडली का? असे प्रश्न त्यांना सतावत आहेत. पण आता या व्हायरल मेसेज आणि वृत्तांमागचं सत्य समोर आलं आहे. उदित नारायण यांच्या मॅनेजरने याबाबतची माहिती दिली आहे.उदित नारायण यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं वृत्त पूर्णपणे चुकीचं असल्याची माहिती समोर आली आहे. ‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, उदित नारायण यांच्या मॅनेजरने यावर प्रतिक्रिया देत ही सर्व वृत्तं खोटी असल्याची माहिती दिली आहे. उदित नारायण यांची तब्येत ठीक आहे आणि त्यांना काहीही झालेलं नाही असं त्यांच्या मॅनेजरने सांगितलं आहे. ट्विटरवर अशा प्रकारचे मेसेज आणि वृत्त व्हायरल झाल्यानंतर आपलं त्यांच्याशी बोलणं झालं असून तेसुद्धा या अशा वृत्तांमुळे त्रासले आहेत असं त्यांच्या मॅनेजरने सांगितलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने