आदिपुरुष’च्या अडचणीत आणखी वाढ; अयोध्येतील राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी केली बॉयकॉटची मागणी


उत्तर प्रदेश: दिग्दर्शक ओम राऊत आणि दाक्षिणात्य अभिनेता प्रभास यांच्या बहुचर्चित ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आणि सगळीकडे याविषयी जोरदार चर्चा सुरू झाली. ५०० कोटी बजेट असणाऱ्या या चित्रपटाचा टीझर एका कार्टूनप्रमाणे वाटत असल्याने प्रेक्षकांनी यावर टीका करायला सुरुवात केली. बहुतेक असं प्रथमच होत आहे की एखाद्या चित्रपटाबद्दल सगळ्यांच्याच भावना आणि मतं ही सारखीच आहेत. ‘आदिपुरुष’च्या टीझरला सरसकट सगळ्यांनीच नापसंती दर्शवली आहे.व्हीएफएक्स मध्ये गडबड होणं ही एक वेगळी गोष्ट आहे पण चित्रपटातील कित्येक दृश्यं ही इतर कलाकृतीची भ्रष्ट नक्कल आहे, तसेच रामायणासारख्या महाकाव्याला बीभत्स पद्धतीने मांडले आहे असेही आरोप लोकांनी केले आहेत. भाजपा आमदार राम कदम यांनी नुकतीच या चित्रपटावर बंदी घालायची मागणी केली आहे. हळूहळू राजकीय वर्तुळातून या चित्रपटावर टीका होताना दिसत आहे, मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनीदेखील यावर सडकून टीका केली होती.

आता अयोध्येतील राम मंदिरातल्या पूजाऱ्यांनी याविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे, प्रभू श्रीराम आणि रावण यांचं अयोग्य पद्धतीने केलेलं सादरीकरणावरुन मंदिरातील मुख्य पुजारी सत्येंद्र दास म्हणाले, “या चित्रपटावर बंदी घालायलाच हवी. चित्रपट बनवणं हा काही गुन्हा नाही पण जाणूनबुजून चर्चेत येण्यासाठी वादग्रस्त पद्धतीने राम आणि रावणाचं सादरीकरण करणं योग्य नाही.”

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने