पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत जाहीर

  नाशिक: नाशिकमध्ये आज पहाटे झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर या खासगी बसने पेट घेतला. यामध्ये होरपळून हे मृत्यू झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या अपघातानंतर पंतप्रधान मोदींनी मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली आहे.नाशिक इथल्या बस दुर्घटनेनंतर पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त केलं आहे. याबद्दल ट्वीट करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, नाशिक इथल्या दुर्घटनेबद्दल ऐकून दुःख झालं. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, माझ्या संवेदना त्यांच्यासोबत आहेत. जखमी लवकरात लवकर बरे होवोत. स्थानिक प्रशासन दुर्घटना बाधितांना सर्वतोपरी मदत करत आहे. नाशिक दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना पंतप्रधान सहाय्यता निधीतून प्रत्येकी २ लाखांची मदत दिली जाणार असून जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने