बसमध्ये भीषण स्फोट, मालीत ११ जणांचा मृत्यू, ५३ जण गंभीर जखमी.

माली: मध्य मालीमध्ये एका बसमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५३ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. बस स्फोटकांनी भरलेल्या उपकरणाला धडकल्याने ही दुर्घटना घडली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘एएफपी’ने या घटनेचे वृत्त दिले आहे.
जिहादी हिंसाचाराचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोप्ती भागात ही घटना गुरुवारी घडली आहे. या घटनेतील सर्व पीडित सामान्य नागरिक होते. दरम्यान, या घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता मालीतील प्रशासनाने व्यक्त केली आहे. मालीमध्ये जिहादी प्रवृत्तींनी आजवर हजारो लोकांचे बळी घेतले आहेत. यामुळे अनेक कुटुंबाना विस्थापित व्हावे लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने