चंद्रशेखर बावनकुळेंना पाठवले खुळखुळे; काँग्रेसचं अनोखं आंदोलन.

पुणे  : पुण्यात युवक काँग्रेसकडून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा निषेध करण्यात येत आहे. त्यासाठी खुळखुळे वाजवून आंदोलन करण्यात येत आहे. बावनकुळे यांना खुळखुळे भेट म्हणूनही पाठवण्यात आले आहेत. बावनकुळे आपल्या केंद्रीय नेतृत्वाच्या नजरेत येण्यासाठी वेळोवेळी महाविकास आघाडीच्या नेतृत्वावर ज्या प्रकारे टीका करत आहेत, या विरोधात युवक काँग्रेसकडून अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला. आज सकाळी युवक काँग्रेसच्या वतीने बावनकुळे यांना दिवाळी भेट म्हणून खुळखुळे पोस्टाने पाठवण्यात आले. यावेळी युवक काँग्रेस चे कार्यकर्त्यांनी खुळखुळे वाजवत निषेध करत ते पोस्टाने पाठवून दिले.काही दिवसांपूर्वी बावनकुळेंनी राष्ट्रवादीच्या विरोधात एक विधान केलं होतं. बारामतीत राष्ट्रवादीचं घड्याळ बंद पाडू असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत होती. बावनकुळेंना तातडीनं उपचारांची गरज आहे, असा टोला रुपाली ठोंबरे पाटलांनी लगावला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने