स्मिता-जयदेव ठाकरेंनी बाळासाहेबांना नेहमी मनस्तापच दिला; आत्तेबहीणीचा गंभीर आरोप

मुंबई: एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात जयदेव ठाकरे आणि स्मिता ठाकरे यांनी मंचावर उपस्थिती लावल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या आत्तेबहीण कीर्ती फाटक यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. स्मिता-जयदेव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंना नेहमी मनस्तापच दिला असा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच, बाळासाहेब हयात असताना स्मिता ठाकरे काँग्रेसमध्ये निघालेल्या, शिंदे विसरले का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना कीर्ती फाटक यांनी संताप व्यक्त केला आहे. कुटुंबातील कलहाचा अशाप्रकारे राजकारणासाठी वापर होणं दुर्देवी आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.सध्याचं सुरु असलेलं राजकारण दुर्वैवी आहे. आमच्या कुटुंबियांना हे राजकारण बघाताना त्रास होत आहे. यापूर्वीही अशा प्रकारचं चित्र आपण बघितलं आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने