‘७० टक्के लोक गुजरातचं मीठ खातात’ म्हणणाऱ्या राष्ट्रपती मुर्मू यांच्यावर काँग्रेस नेत्याची वादग्रस्त टीका, म्हणाले “ही तर चमचेगिरीची…”

 दिल्ली : काँग्रेस नेते आणि माजी खासदार उदीत राज यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासंबंधी केलेल्या विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. ‘कोणत्याही देशाला असे राष्ट्रपती मिळू नयेत’ असं वक्तव्य उदीत राज यांनी केलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या या विधानानंतर टीका होऊ लागली आहे. राष्ट्रीय महिला आयोगानेही त्यांच्या या वक्तव्याची दखल घेतली असून, माफी मागण्यास सांगितलं आहे. दरम्यान, उदीत राज यांनी स्पष्टीकरण देताना हे आपलं वैयक्तिक मत असल्याचं म्हटलं आहे. 

उदीत राज यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की “कोणत्याही देशाला द्रौपदी मुर्मू यांच्यासारख्या राष्ट्रती मिळू नयेत. चमचेगिरीची पण हद्द असते. ७० टक्के लोक गुजरातचं मीठ खातात असं त्या म्हणतात. स्वत: मीठ खाऊन आयुष्य घालवलं, तरच यांना कळेल”.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने