राज्य उत्पादन शुल्क कारवाई; पावणेदहा लाखांचा मद्यसाठा जप्त

 कोल्हापूर : सरनोबतवाडी (ता. करवीर) परिसरातून टेम्पोतून मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतले. सौरभ सतीश ढोकळे (वय २२, रा. उस्मानाबाद) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून नऊ लाख ७३ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे दुय्यम निरीक्षक आर. जी. यवलुजे यांनी सांगितले.राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेली माहिती - अशी कोल्हापूरच्या विभागीय भरारी पथकाने आज सरनोबतवाडी परिसरात छापा टाकून टेम्पोचालक संशयित सौरभ ढोकळेला ताब्यात घेतले. त्या टेम्पोतून पथकास मद्याचे १३५ बॉक्स मिळून आले. त्याची किंमत नऊ लाख ७३ हजार ४४० रुपये इतकी असून, वाहनासह एकूण १७ लाख ७३ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. निरीक्षक एस. जे. डेरे, दुय्यम निरीक्षक आर. जी. यवलुजे, एस. एस. गोंदकर, अंमलदार सुशांत बनसोडे, विलास पवार, अमोल यादव, दीपक कापसे, योगेश शेलार यांनी ही कारवाई केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने