शाळेच्या टॉयलेटमध्ये नेऊन विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार!

 दिल्ली: राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीतील एका केंद्रीय विद्यालयात शिकणाऱ्या एका 11 वर्षीय मुलीने शाळेच्या शौचालयात दोन विद्यार्थ्यांनी बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. जुलै महिन्यात आपल्यासोबत हा प्रकार घडल्याचा आरोप विद्यार्थिनीने केला आहे. याबाबत मुलीने पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दिल्ली महिला आयोगाने दिल्ली पोलीस आणि शाळेला नोटीस बजावली आहे.


दिल्ली पोलिस उपायुक्त अमृता गुगुलोथ यांनी सांगितले की, या प्रकरणी आयपीसीच्या संबंधित कलम आणि पॉक्सो कायद्याच्या कलम 6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित केंद्रीय विद्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अशा कोणत्याही घटनेची माहिती पिडीतेने किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी शाळा किंवा मुख्याध्यापकांना दिली नाही.

शाळेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिल्यानंतर आम्हाला या घटनेची माहिती मिळाली आहे. त्यांनी तपास सुरू केला आहे. एकाही विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकण्यात आलेले नाही. प्रादेशिक कार्यालयाने तपास सुरू केला असून या घटनेबाबत दिल्लीतील महिलेला सविस्तर उत्तर पाठवले जाईल. याप्रकरणी आम्ही पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य करत आहोत.टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने