सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ

 बंगळूर : कर्नाटक सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर सुखद बातमी दिली आहे. एक जुलैपासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने महागाई भत्त्यात ३.७५ टक्के वाढ करण्याचे आदेश जारी केले आहेत. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली.ते म्हणाले, ‘राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता एक जुलैपासून ३.७५ टक्के वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सरकारने एक हजार २८२.७२ कोटी रुपये वार्षिक खर्च दिला जाईल. याबाबत सरकारी आदेश जारी केला जाईल, असे ट्विट त्यांनी केले. नुकताच केंद्र सरकारनेही आपल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने