Dasara Melava 2022: नाशिक-मुंबई महामार्गावर शिवसेना आणि शिंदे गटात राडा

 मुंबई: शिवसेनेतून बंडखोरी करून शिंदे आणि समर्थक बाहेर पडल्यानंतर यावर्षी मुंबईत दोन दसरा मेळावे पार पडणार आहेत. या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याच लक्ष लागलं असून शिंदे गटाकडून मेळाव्यासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून शिंदे गटाने मेळाव्यासाठी 3 लाख लोक येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी देखील आपल्या कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर शिवसेना आणि शिंदे गटात बाचाबाची झाली आहे. हे सर्व कार्यकर्ते मुंबईत दसरा मेळाव्यासाठी निघाले होते. कोणी शिंदे गटाच्या मेळाव्याला तर कोण शिवसेनेच्या मेळाव्याला जात होते. अचानक दोन्ही गटाच्या गाड्या शेजारी आल्या आणि एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करू लागल्याने हा वाद झाल्याचे सांगितले जात आहे. तर असा ही आरोप केला जात आहे. की शिंदे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी अश्लील हावभाव केले त्यामुळे हा राडा झाला.दरम्यान या राड्यात महिलांचा देखील सहभाग होता. मोठ्या संख्येने कार्यकर्ते नाशिक वरून मुंबईच्या दिशेने निघाले होते. या वादात काही महिलांनी बोलेरो गाडीतील काही शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना मारहान केल्याचे समजते. दरम्यान बंदोबंस्तासाठी असलेल्या पोलिसांनीयात मध्यस्ती केल्यामुळे वाद मिटला आहे.
टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने