उद्धव ठाकरेंच्या भाषणात शिमगा सोडून काहीच नव्हतं; फडणवीसांची टीका

 मुंबई :दसरा मेळाव्याची दोन्ही भाषणे ऐकता नाही आली. धम्म चक्र प्रवर्तक दिनाच्या निमित्ताने बाहेर असल्यामुळे भाषण ऐकता आलं नाही. थोड उशिरा शिंदेचं भाषण ऐकलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलं की खरी शिवसेना कोणची आहे ते. उद्धव ठाकरेच्या भाषणात शिमगा सोडून काहीच नव्हतं. Bkc मैदानावर मात्र प्रचंड गर्दी होती असंही फडणवीस म्हणलेत.ज्या प्रमाणात लोक बीकेसीच्या मैदानावर पाहायला मिळाले ते पाहाता काल एकनाथ शिंदेंनी हे दाखवून दिलं की खरी शिवसेना कोणती. त्या मैदानाची क्षमता शिवाजी पार्कपेक्षा दुप्पट आहे. पण तरीही तिथे तुडुंब गर्दी होती. महाराष्ट्रभरातून लोक आले होते. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच, हे कालच्या मेळाव्यात प्रस्थापित केलं आहे. यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो.

तसेच, “शिमग्यावर कधीही प्रतिक्रिया देत नसतात”, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणातील प्रत्येक मुद्द्यावर हे एकच उत्तर असल्याचे त्यांनी सांगितलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने