जयदेव ठाकरेंच्या कुंचल्यातून साकारलेलं शिवधनुष्य CM शिंदेंना भेट

मुंबई एकिकडे धनुष्यबाण चिन्ह कुणाचे याचा निर्णय प्रलंबित असताना दुसरीकडे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे बंधू जयदेव ठाकरे यांनी कुंचल्यातून साकारलेलं शिवधनुष्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेट म्हणून दिलं आहे. त्यांच्या या भेटीमुळं राजकीय वर्तुळाच चर्चेला उत आला आहेदोनदिवसांपूर्वी, शिवसेनेचं मूळ चिन्ह ‘धनुष्यबाण’ हे ‘बाळासाहेबांची शिवसेना’ अर्थातच शिंदे गटाला मिळेल, अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार ठाकरे यांनी दिली होती. दरम्यान, आज जयदेव ठाकरेंच्या कुंचल्यातून साकारलेलं शिवधनुष्य मुख्यमंत्री शिंदे यांना भेट देण्यात आले. जयदेव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी हिंदूत्वाचं शिवधनुष्य साकारलं होत अस सांगण्यात येत आहे.

जयदेव ठाकरे यांच्या पत्नी अनुराधा ठाकरे यांनी वर्षा निवास्थानी दाखल होत. अनुराधा ठाकरे यांनी जयदेव ठाकरेंच्या कुंचल्यातून साकारलेलं शिवधनुष्य मुख्यमंत्र्यांना भेट दिले. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या भेटीमागे अनेतर तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे बंधू जयदेव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला उपस्थिती लावल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. अनेक तर्क वितर्क लावण्यात येत होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने