एक्स बॉयफ्रेंडच्या बहीणीसोबत दिशा पटानी लंचला! चाहते म्हणाले; भावाला सोडलं..

मुंबई :बॉलीवूड इंडस्ट्रीत कोण कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे आणि कोणाचे ब्रेकअप कधी होईल, हे सांगणे थोडे कठीण आहे. टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांच्या नात्याबाबतही असेच काहीसे बोलले जात आहे. वास्तविक, दोघेही अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते आणि यापूर्वीही बातम्या समोर आल्या होत्या, आता हे दोघे एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. त्याचवेळी दिशा पटानी मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर टायगरची बहीण कृष्णा श्रॉफसोबत स्पॉट झाली.टायगरसोबतच्या ब्रेकअपच्या बातम्यांदरम्यान आता दिशा पटानी टायगरची बहीण कृष्णा श्रॉफसोबत दिसली. दोघांनी मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये जेवण केले आणि नंतर कारमधून एकत्र निघाले. दरम्यान, दिशा कृष्णाचा हात पकडून तिची खूप काळजी घेताना दिसली. दोघांचे हे बॉन्ड पाहून चाहते टायगर आणि दिशा पुन्हा एकदा पॅचअप झाले की काय असा अंदाज लावत आहेत. एका यूजरने लिहिले की, तुम्हा दोघांचे हे बंध खूप गोड आहेत. तर तिथे कोणीतरी लिहिले आहे की, 'टायगर श्रॉफसोबत ब्रेकअप झाले होतेना.. तर हे काय? " तर एकाने लिहिले आहे की, 'कधी न होणाऱ्या नंनद भावजय एकत्र कश्या काय?'

टायगर आणि दिशाची अनेक वर्षांपासून एकमेकांना भेट करत होते. जोडपे जवळपास 6 वर्षे एकमेकांना डेट करत होते. दोघे अनेकदा एकत्र दिसले. चाहते या दोघांच्या लग्नाची बरीच चर्चा होत होती पण काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या ब्रेकअप च्या होण्याच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना वाईट वाटले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने