स्टेट बँक ऑफ इंडियाची ग्राहकांना दिवाळी भेट; मुदत ठेवींवरील व्याजात केली वाढ

मुंबई:  देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या ग्राहकांना दिवाळी भेटवस्तू देताना मुदत ठेवींवरील व्याजात 80 अंकांनी वाढ केली आहे. 22 ऑक्टोबरपासून लागू होणारे हे नवीन दर पुढील कालावधीसाठी देखील लागू करण्यात आले आहेत. नवीन व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडी (FD) वर लागू होतील. बँकेने आपल्या वेबसाइटवर याबाबत अधिसूचना जारी केली आहे. या वाढलेल्या दरांचा सर्वाधिक फायदा ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे.स्टेट बँक ऑफ इंडिया 5 ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी केलेल्या एफडी (FD) वर 6.10% दराने व्याज देत आहे.

·       3 ते 5 वर्षांच्या एफडी (FD) वर 6.10% दराने व्याज मिळेल.

·       2 ते 3 वर्षांच्या एफडी (FD) वर 5.65% ऐवजी 6.25% व्याज मिळेल.

·       1 ते 2 वर्षांच्या एफडी (FD) वर आता 5.60% ऐवजी 6.10% व्याज मिळेल.

ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन एफडी दर :

·       5 ते 10 वर्षांच्या एफडी (FD) वर 6.90% दराने व्याज दिले जात आहे.

·       3 ते 5 वर्षांच्या एफडीवर (FD) 6.60 टक्के दराने व्याज मिळत आहे.

·       2 ते 3 वर्षांच्या एफडीवर (FD) वर 6.15% ऐवजी 6.75% व्याज दिले जात आहे.

·       1 ते 2 वर्षांच्या एफडीवर (FD) वरील व्याजदर 6.10% वरून 6.60% करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने