प्रदर्शनाच्या आधीच आयुष्मान खुरानाच्या ‘डॉक्टर जी’ला मोठा फटका, निर्माते निराश.

मुंबई : आयुष्मान खुराना हा सातत्याने करत असणाऱ्या त्याच्या वेगवेगळ्या प्रयोगांसाठी ओळखला जातो. ‘विकी डोनर’, ‘अंधाधून’, ‘दम लगाके हैशा’, ‘बरेली की बर्फी’, ‘ड्रीम गर्ल’, ‘आर्टिकल १५’ अशा वेगवेगळ्या चित्रपटातून आयुष्मानने स्वतःला एक उत्तम अभिनेता म्हणून सिद्ध केलं आहे. आता पुन्हा आयुष्मान असाच एक वेगळा चित्रपट घेऊन येत आहे, त्याचं नाव आहे ‘डॉक्टर जी.’

आयुष्मानचा ‘डॉक्टर जी’ हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आयुष्मानचे चाहते आणि सगळेच चित्रपटप्रेमी या नवीन चित्रपटासाठी अतिशय उत्सुक होते. नेहमीप्रमाणेच आयुष्मान काहीतरी वेगळं कथानक मांडेल अशी सगळ्यांना अपेक्षा होती. आयुष्मानही गेली अनेक दिवस या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत होता. तसेच हा चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांनी पाहवा यासाठी निर्मात्यांनी या चित्रपटाच्या तिकिटांच्या दरातही कपात केली होती. परंतु या चित्रपटाला प्रदर्शनाच्या आधीच एक मोठा फटका बसला आहे.हा चित्रपट पहिल्या दिवशी ८ ते १० कोटींची कमाई करेल अशी निर्मात्यांना आशा होती. परंतु या चित्रपटाच्या अडव्हान्स बुकिंगला संथ प्रतिसाद मिळाला. तीन बड्या थिएटर्समध्ये या चित्रपटाची फक्त १९ हजार तिकिटे अडव्हान्स बुकिंगच्या माध्यमातून विकली गेली. ही आकडेवारी निर्मात्यांसाठी निराशाजनक होती. त्यामुळे हा चित्रपट फारशी चांगली कामगिरी करू शकणार नाही असे बोलले जात आहे.डॉक्टर जी’ या चित्रपटात आयुष्मान एका स्त्रीरोगतज्ञाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासह रकुल प्रीत सिंग, शैफाली शहा आणि शीबा चड्ढा असे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून आयुष्यमानने ‘उद्य गुप्ता’ नावाच्या स्त्रीरोगतज्ञाची (Gynecologist) व्यथा मिश्कीलपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने