दुबईत साकारलं पहिलं हिंदू मंदिर

दुबई:  दुबईमध्ये हिंदू मंदिर साकारल्या गेलं असून दहा वर्षापासून दुबईतील भारतीयांच्या मनातील स्वप्न आता सत्यात उतरलंय. संयुक्त अरब अमिरातचे मिनिस्टर ऑफ टॉलरंस शेख नाहयान बिन मुबारक यांच्या हस्ते या मंदिराचं उद्घाटन करण्यात आलं.

दसऱ्याच्या एक दिवसाआधी या मंदिराचं अधिकृतरित्या उद्घाटन करण्यात आलं. हे भव्य मंदिर जेबेल अलीमधील अमीरातच्या कॉरिडोरमधल्या ऑफ टॉलरंसमध्ये बांधण्यात आलंय. हे मंदिर जवळपास ७०,००० स्केअर फुट क्षेत्रामध्ये आहे. मंदिराच्या उद्घाटनावेळी २०० पेक्षा जास्त गणमान्य पाहुणे हजर होते. या मंदिराची विशेषता सांगायची झाल्यास या मंदिरात चर्च, गुरूद्वारासह अन्य धार्मिक स्थेळेही आहेत.टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने