भेट झाल्यानंतर लगेच क्लिनचिट मिळाली? रश्मी शुक्ला प्रकरणावर खडसेंचा गौप्यस्फोट.

मुंबई :  रश्मी शुक्ला यांना क्लीन चिट मिळाल्यानंतर राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. बहुचर्चित फोन टॅपिंग प्रकरणी पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. पुणे पोलिसांकडून या प्रकरणी कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला. त्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.खडसे यांनी बोलताना म्हंटलं की, रश्मी शुक्ला यांची राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्या दिवशी भेट झाली, त्याच दिवशी त्यांना क्लीन चीट मिळणार हे स्पष्ट झालं होतं, त्यानुसारच रश्मी शुक्ला यांना क्लीन चीट मिळाली असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.ज्यांनी 50 खोके घेतली आहेत त्यांचे पोलीस संरक्षण कधी काढणार? असा प्रश्नही खडसेंनी यावेळी उपस्थित केला आहे. सरकारच्या विरोधात जो आंदोलन करतो त्याला कशा पद्धतीनं त्रास दिला जातो, तसेच ना उमेद केलं जात अशीच भूमिका नेहमी सरकारची राहिली असल्याचेही एकनाथ खडसे यावेळी म्हणालेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने