आता शिंदे गटाचे चिन्हदेखील वादाच्या भोवऱ्यात; शीख समाजाने घेतला आक्षेप.

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव दिल्यानंतर आज तलवार चिन्ह बहाल केलं आहे. शिंदे गटाने काल दिलेले पर्याय निवडणूक आयोगाने नाकारले होते. दरम्यान, शीख समाजाने शिंदे गटाच्या या चिन्हावर आक्षेप घेतला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असं नाव वापरण्यास परवानगी दिलेली आहे. तर शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' असं नाव मिळालेलं आहे. दुसरीकडे आयोगाने ठाकरेंना मशाल चिन्ह दिलेलं आहे. तर शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना गटाला ढाल तलवार चिन्ह प्रदान केलं.ढाल तलवार चिन्हावर नांदेडच्या शीख समाजातर्फे आक्षेप नोंदवण्यात आला आहे. सचखंड गुरुद्वार बोर्डाचे माजी रंजीत सिंह कामठेकर यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाला निवेदन पाठवलं आहे.
काय म्हटले आहे निवेदनात?

शिंदे गटाला मिळालेल्या ढाल-तलवार या चिन्हावर शीख समाजानं आक्षेप घेतला आहे. खालसा समाजाच्या धार्मिक प्रतिकाशी हे चिन्ह मिळतं जुळतं असल्याने त्याचा निवडणून चिन्ह म्हणून वापर होऊ नये, अशी मागणी सचखंड गुरुद्वार बोर्डाचे माजी सचिव रंजीत सिंह कामठेकर यांनी केली आहे. तसेच हे निवदेन त्यांनी निवडणूक आयोगालाही पाठवलं आहे.

एकनाथ शिंदे गटानं सूर्य हे चिन्ह मागितलं होतं. मात्र ते झोराम राष्ट्रीय पक्ष आणि द्रमुकशी संबंधित असल्यानं ते देण्यात आलं नाही. तर, ढाल तलवार हे चिन्ह पीपल्स डेमोक्रॅटिक मूव्हमेंटकडे होतं. मात्र ते पक्ष २००४ ला यादीतून वगळ्यात आल्यानं शिंदे गटाच्या 'बाळासाहेबांची शिवसेने'ला दोन तलवार आणि एक ढाल हे चिन्ह मिळालं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने