गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होण्याची शक्यता.

गुजरात : भारतीय निवडणूक आयोग  गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने आज दुपारी ३ वाजता नवी दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. यातच ही घोषणा होण्याची शक्यता आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार ही पत्रकार परिषद घेणार आहेत.

गुजरात विधानसभेची मुदत १८ फेब्रुवारी २०२३ ला संपते आहे. १८२ सदस्य संख्या असलेल्या गुजरात विधानसभेत १११ आमदार भाजपाचे आहेत. याशिवाय काँग्रेसचे ६२ आमदार आहेत. दुसरीकडे हिमाचल प्रदेश विधानसभेची मुदत ८ जानेवारी २०२३ रोजी संपत आहे. हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाचे ४५ आमदार आहेत, तर काँग्रेसचे २० आमदार आहेत.


दरम्यान, सप्टेंबरमध्येच मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांनी गुजरात आणि हिमाचल प्रदेशला भेट देऊन निवडणूक तयारीचा आढावा घेतला होता. गुजरातमध्ये त्यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि राष्ट्रीय पक्षांच्या प्रतिनिधींची भेट घेतली.दोन्ही राज्यांमधील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला की, लगेचच आचार संहिता लागू होईल. यानंतर राजकीय प्रचाराला जोरदार सुरुवात होईल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने