ठाकरे गटाचे प्रतिज्ञापत्र बाद; अखेर निवडणूक आयोगाने दिले स्पष्टीकरण

मुंबईः राजकीय वर्तुळात कालपासून केंद्रीय निवडणूक आयोगानं ठाकरे गटाकडून सादर करण्यात आलेले अडीच लाख प्रतिज्ञापत्रं बाद केली आहेत. अशा बातम्या समोर येतत आहेत. यावर आता निवडणुक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे. ठाकरे गटाची शपथपत्र बाद करण्याचा अद्याप कोणताही निर्णय नाही. असे निवडणुक आयोगाने स्पष्ट केलं आहे. तसेच, सध्या ठाकरे गटाची शपथपत्र निवडणुक आयोगाला मिळाली आहेत. सध्या शपथपत्र तपासणीचे काम सुरू आहे. त्यामुळे अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे निवडणुक आयोगाने म्हटलं आहे.ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे ११ लाख प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली होती. यातील अडीच लाख प्रतिज्ञापत्रे बाद करण्यात आली आहेत. असे वृत्त गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत आहे.या वृत्तावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संबंधित बातमी खोटी असून बातमीच्या स्त्रोतावर विश्वास ठेवू नका असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

तर,ठाकरे गटाचे प्रतिज्ञापत्रे रद्द झाले, असा नॅरेटीव्ह सेट करण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे. लोकांमध्ये भ्रम पसरवण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न सुरू आहे. ज्याप्रमाणे ईडीच्या कारवाई करण्याआधी पहिले एखाद्या नेत्यावर आरोप केले जातात. त्याची प्रतिमा डागाळली जाते व नंतर ईडी कारवाई केली जाते.त्याचप्रमाणे आता निवडणूक आयोग काय निर्णय देणार, याबाबत लोकांमध्ये नॅरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. असा आरोप ठाकरे गटाचे प्रवक्ते व खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने