मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात; मंत्री भुमरेंच्या मावसभावाचा मृत्यू.

 मुंबई : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर एका टेम्पोचा आणि इनोव्हा गाडीचा अपघाताची घटना घडली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू तर दोघेजण जखमी झाले आहेत. मृत्यू झालेले अंबादास हरिश्चंद्र नरवणे हे मंत्री संदीपान भुमरे यांचे मावसभाऊ असल्याची माहिती समोर येत आहे.अधिक माहितीनुसार, अंबादास नरवणे हे मुंबईच्या दिशेने जात असताना कामशेतजवळ त्यांच्या गाडीने पुढे चालत असलेल्या टेम्पोला धडक दिली. त्यानंतर इनोव्हा गाडी रस्ता दुभाजकाला जाऊन धडकली. या अपघातात नरवणे यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.दरम्यान, नरवणे यांच्यासोबत त्यांच्या गाडीचे चालक आणि त्यांचे मित्र होते. या अपघातात हे दोघेही जखमी झाले असून नरवणे यांचा मृत्यू झाला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने