कोल्हापूर : शिरोळ तालुक्यात सर्वाधिक कर्करोग ; चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर शेतकरी संघटनांची टीका

 कोल्हापूर : ऊस शेतीच्या माध्यमातून शिरोळ तालुका हा राज्यातील सर्वाधिक कर्करोग रुग्णांचा जिल्हा बनला आहे, असे विधान उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी त्या विरोधात जोरदार आक्षेप नोंदवला आहे.पुणे येथे काल राज्यस्तरीय नैसर्गिक शेती परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी मंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील मुबलक उसाचे पीक घेतले जाते. त्यासाठी पाणी, रासायनिक खत याचा मुबलक वापर केला जातो. त्याचे घटक हळूहळू पाण्याच्या स्त्रोतांत मिसळले जातात. हे पाणी पिल्याने शिरोळ तालुक्यात राज्यात सर्वाधिक कर्करोगाचे रुग्ण आढळतात.याला जोरदार आक्षेप घेतला जात आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी , चंद्रकांत पाटील यांनी असे विधान करण्यापूर्वी राहुरी कृषी विद्यापीठात शिकवणी घ्यावी किंवा रेशीम बागेत जाऊन एखादा लघुकालीन अभ्यासक्रम शिकावा,असा टोला लगावला. पंचगंगा नदीमध्ये औद्योगिक प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे. त्याचे पाणी पिण्यात वापरल्यामुळे पंचगंगा नदीकाठच्या रुग्णांना कर्करोग झाला आहे. दूधगंगा ,वारणा, कृष्णा नदीकाठी कर्करोगाचे प्रमाण कमी आहे. हे रायचूर विद्यापीठातील जागतिक स्तराच्या प्रयोगशाळेत तपासणीत दिसून आले आहे, हे मंत्र्यांनी समजून घ्यावे,अशी टीका त्यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने