५३व्या ‘इफ्फी’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपटांचा झेंडा, प्रवीण तरडेंच्या ‘धर्मवीर’चाही समावेश

मुंबईः भारतातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अशी ओळख असलेल्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (IFFI) सध्या चर्चा सुरु झाली आहे. या महोत्सवासाठी ५ मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. तसेच हिंदीसह इतर भाषांमधील बऱ्याच चित्रपटांचा इफ्फीमध्ये समावेश असणार आहे. गोव्यामध्ये २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर हा चित्रपट महोत्सव पार पडणार आहे. यादरम्यान हिंदी, दाक्षिणात्या चित्रपटांसह मराठी चित्रपटांचंही स्क्रिनिंग असणार आहे.‘एएनआय’ने ट्वीट करत इफ्फीमध्ये ज्या चित्रपटांचं स्क्रिनिंग होणार आहे त्याची यादी जाहीर केली आहे. ५३व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये २५ फिचर तर २० नॉन-फिचर चित्रपटांचं खास स्क्रिनिंग ठेवण्यात आलं आहे. ३५४ चित्रपटांमधून फक्त २५ फिचर चित्रपटांची निवड या महोत्सवासाठी करण्यात आली आहे.विक्रम पटवर्धन यांचा ‘फ्रेम’, दिग्पाल लांजेकर यांचा ‘शेर शिवाजी’, डॉ. सलील कुलकर्णी यांचा ‘एकदा काय झालं’ या तीन मराठी चित्रपटांची फिचर चित्रपट अंतर्गत निवड करण्यात आली आहे. तसेच ‘धर्मवीर : मुक्कामपोस्ट ठाणे’ चित्रपटाचाही यामध्ये समावेश आहे. नॉन फिचर चित्रपटांमध्ये शेखर रणखांबे यांच्या ‘रेखा’ चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.

त्याशिवाय ‘आरआरआर’, ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटांनीही इफ्फीमध्ये बाजी मारली आहे. जवळपास आठ दिवस हा चित्रपट महोत्सव सुरु असणार आहे. इफ्फीमध्ये बरीच दिग्गज कलाकार मंडळी हजेरी लावताना दिसतात. यंदा कोणकोणते कलाकार गोव्यामध्ये चित्रपट महोत्सवासाठी दाखल होणार हे पाहावं लागेल.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने