रक्ताने माखलेले हात आणि रहस्यमय हावभाव; कार्तिक आर्यनचा ‘फ्रेडी’मधील फर्स्ट लूक व्हायरल

मुंबईः कार्तिक आर्यन हा बॉलिवूडमधील एक आघाडीचा अभिनेता बनला आहे. याआधी एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिल्यामुळे कार्तिकच्या चित्रपटांची प्रेक्षक आवर्जून वाट बघत असतात. कार्तिकच्या ‘भूल भुलैया २’ने अनेक रेकॉर्ड्स मोडले. पण आता त्याचा आगामी चित्रपट ‘फ्रेडी’ थेट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. गेले काही दिवस कार्तिक त्याच्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्यातील काही चित्रपटांचे शूटिंग त्याने पूर्ण केले असून ते रिलीजसाठी सज्ज आहेत.कार्तिक काही महिन्यांपूर्वी ‘फ्रेडी’ या चित्रपटावर काम करत होता. त्याचा हा चित्रपट थिएटरमध्ये नाही, तर डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टरसुद्धा समोर आलं आहे. कार्तिकने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून हे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

चित्रपटाच्या पोस्टरवर, कार्तिक हातात रक्ताने बरबटलेल्या हातात दातांचा सेट धरून आहे. त्याचे हावभाव फारच रहस्यमय आहेत, ज्यामुळे आपल्याला चित्रपटात काय पाहायला मिळणार आहे याचा अंदाज लावता येऊ शकतो. या पोस्टरने खरोखरच ‘फ्रेडी’साठी उत्सुकता निर्माण केली आहे आणि आता प्रत्येकजण चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहे.याबद्दल कार्तिक आर्यन म्हणाला, “‘फ्रेडी’ चित्रपटाचा मला भाग होण्यासाठी संधी मिळाल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो. या चित्रपटाची कथा अत्यंत वेगळी आहे. या आधी मी अशी कथा कधीही पाहिलेली नव्हती. त्यामुळे ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’वर हा चित्रपट रिलीज होण्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे आणि मला खात्री आहे की, प्रेक्षकांना हा चित्रपट आवडेल.” दरम्यान, ‘फ्रेडी’ व्यतिरिक्त कार्तिक आर्यनकडे ‘शहजादा’ आणि ‘सत्य प्रेम की कथा’ हे चित्रपट आहेत. शिवाय कबीर खानचा ‘स्ट्रीट फायटर’ आणि हंसल मेहता यांच्या ‘कॅप्टन इंडिया’मध्येही तो झळकणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने