गॅस दरावर नियंत्रणासाठी युरोपीय देशांची धडपड

 युरोप: युक्रेन युद्धानंतर युरोपमध्ये नैसर्गिक वायूच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी युरोपीय देश झगडत असून सदस्य देशांमध्ये मतभेद असल्याने यामध्ये अडचणी येत असल्याचे दिसून येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. हिवाळ्यामुळे ऊर्जेची मागणी वाढणार असल्याने लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी युरोपीय देश, विशेषत: फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन हे प्रयत्नशील आहेत.युरोपमधील बहुतेक देशांना रशियाकडून नैसर्गिक वायूचा पुरवठा होतो. युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर अनेक देशांनी रशियावर निर्बंध घातले, तर रशियानेही काही देशांना असलेला पुरवठा बंद केला. सध्या युरोपमधील २७ पैकी केवळ १३ देशांना रशियाकडून नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरु आहे. त्यामुळे युरोपमध्ये ऊर्जेचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.त्यामुळे वायू आणि वीजेची समस्या गंभीर झाली असून काही देश वीजेचा कमीत कमी वापर करण्याचे नागरिकांना आवाहन करत आहेत. काही देशांमध्ये कारखाने बंद करावे लागले असल्याने त्याचा अर्थव्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नैसर्गिक वायूच्या दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी युरोपीय महासंघाचा प्रयत्न करत आहे. मात्र, युरोपमधील विविध देश हे ऊर्जेसाठी वेगवेगळ्या स्रोतांवर अवलंबून असल्याने नैसर्गिक वायूचा कमाल दर किती असावा, यावरून त्यांच्यात मतभेद आहेत. वाढलेल्या वायूदराचा कारखान्यांतील उत्पादनांच्या किमतीवरही परिणाम होणार असल्याने हे मतभेद आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु असून आज मॅक्रॉन यांच्यासह १५ युरोपीय देशांच्या प्रमुखांनी युरोपीय आयोगाकडे वायूदराबाबत लवकरात लवकर तोडगा काढण्याची विनंती केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने