दसऱ्याच्या दिवशी मदरश्यात घुसून केली पूजा; मुस्लीम समाजाची निदर्शने

 कर्नाटक: दसऱ्याच्या दिवशी मदरश्यात जाऊन पूजा केल्याप्रकरणी कर्नाटकात ९ जणांवर कारवाई करण्यात आली असून ४ जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. या घटनेनंतर आरोपींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मुस्लीम समाजातल्या लोकांनी पोलीस स्टेशनच्या बाहेर निदर्शनं केली.

कर्नाटकातल्या बिदर जिल्ह्यामध्ये काही लोकांचा गट दसऱ्याच्या दिवशी महमूद गवान मदरस्यात घुसला आणि त्यांनी तिथे पूजा केली. या गटाने मदरस्यात नारळ फोडल्याने मदरस्याच्या इमारतीचं नुकसान झाल्याचा आरोपही मुस्लीम समाजातल्या काही लोकांनी केलं आहे. पोलिसांनी मात्र अद्याप या आरोपांची पुष्टी केलेली नाही. वारसा वास्तूमध्ये बेकायदेशीरपणे घुसखोरी केल्याच्या आरोपाखाली नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधिक्षक महेश मेघन्नवार यांनी दिली आहे.हा मदरसा पुरातत्व विभागाच्या ताब्यातला आहे. याचं बांधकाम १४६० च्या काळातलं आहे. बहमनी राज्याच्या काळातलं हे बांधकाम असून यावर इंडो इस्लामिक शैलीचा प्रभाव आहे. हा मदरसा राष्ट्रीय स्तरावरच्या महत्त्वाच्या बांधकामांपैकी एक आहे. या घटनेनंतर पोलिसांनी या मदरश्याबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने