विजय देवरकोंडाच्या लग्नाबद्दल केलेल्या वक्तव्यावर जान्हवी कपूरचे स्पष्टीकरण, म्हणाली, “आम्ही दोघं…” नुकतंच जान्हवीने एका मुलाखतीत दाक्षिणात्य अभि

मुंबई:  बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती नेहमी काही ना काही कारणाने चर्चेत असते. जान्हवी ‘मिली’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या जान्हवी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकतंच जान्हवीने एका मुलाखतीत दाक्षिणात्य अभिनेता विजय देवराकोंडा याच्याबद्दल एक आश्चर्यकारक विधान केलं होतं. आता तिने तिच्या विधानाचं स्पष्टीकरण दिलं आहे.

जान्हवीला ‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला. “कलाविश्वातील कोणत्या तीन अभिनेत्यांना तुझ्या स्वयंवरमध्ये बघायला आवडेल?”, असा प्रश्न जान्हवीला विचारण्यात आला. यावर उत्तर देत जान्हवीने “हृतिक रोशन, टायगर श्रॉफ आणि रणबीर कपूर”, या अभिनेत्यांची नावे घेतली. परंतु, रणबीर कपूरचं लग्न झालं असल्याचं लक्षात येताच “रणबीरचं लग्न झालं आहे”, असं ती म्हणाली. नंतर जान्हवी म्हणाली, “सगळेच विवाहबंधनात अडकले आहेत.”यानंतर जान्हवीच्या स्वयंवरसाठी तिला मुलाखतीत दाक्षिणात्य अभिनेता विजय देवराकोंडाचं नाव सजेस्ट करण्यात आलं. यावर जान्हवीने “व्यावहारीकदृष्ट्या त्याचं लग्न झालं आहे”, असं उत्तर दिलं. जान्हवीचं हे उत्तर ऐकून सगळयांनाच आश्चर्य वाटलं. पण ती विजयबद्दल असं का बोलली याचा तिने आता खुलासा केला आहे.‘टाईम्स ऑफ इंडिया’शी बोलताना तिला तिच्या या विधानाचे कारण विचारण्यात आले. तेव्हा ती म्हणाली, “विजय आणि मी एकमेकांना नीट ओळखत नाही. तसंच आम्ही एकमेकांशी कधी फारसं बोललोही नाही. त्यामुळे तो माझ्या स्वयंवाराचा भाग होऊ शकत नाही असं मी म्हणाले.”दरम्यान विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदाना एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मध्यंतरी ते एकत्र फिरायलाही गेले होते. ‘इंडियन एकसपरेसला’ दिलेल्या मुलाखतीत विजयने यावर स्पष्टीकरणही दिलं होतं. “लोक तुमच्यावर प्रेम करतात. त्यामुळे तुमच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ते उत्सुक असतात. तुमच्या जीवनात काय चाललंय हे जाणून घ्यायला त्यांना आवडतं. अशा चर्चांमुळे मला काहीही फरक पडत नाही”, असं तो म्हणाला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने