डॉ. कलाम यांचे आयुष्यभर जपावे असे '5' विचार.

 नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती, थोर वैज्ञानिक यांचे संपूर्ण जीवनच आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे अनेक विचार अनेकांचे आयुष्य घडवणारे ठरले आहेत. जीवनाला एक दिशा दर्शक आहेत. त्यामुळेच ते आयुष्यभर जपावे आणि यशाची शिखरं गाठावी असेच आहेत.आज त्यांच्या जयंतीचं औचित्य साधत हे प्रेरणादायी विचार नक्की शेअर करा. आयुष्याच्या कठीण प्रसंगात पुन्हा नव्या उमेदीने उभं राहण्यास हे स्फूर्तीदायी विचार नक्की मदत करतील.डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याविषयी थोडक्यात

 • डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 साली दक्षिण भारतातील रामेश्वरम येथे झाला.

 • तिरूचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेज मध्ये त्यांनी शिक्षण घेतले.

 • डॉ. कलाम हे भारताचे 11 वे राष्ट्रपती आहेत. 2002 साली भारताच्या राष्ट्रपतीपदी ते विराजमान झालेत.

 • पाच वर्षांचा कार्यकाल संपल्यानंतर ते पुन्हा आपल्या विज्ञान प्रसाराच्या कार्यात रूजू झाले.

 • शिक्षण, लेखन आणि सार्वजनिक सेवा यांच्यामध्ये त्यांनी स्वतःला वाहून घेतलं होतं.

 • डॉ. कलाम यांच्यामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत चैतन्य, नवं काही शिकण्याची आणि शिकवण्याची उर्जा कायम होती.

 • त्यांचं प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आजही अनेकांना नैराश्यातून, अपयशातून, अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी दिशादर्शक आहेत.

 • आपल्या पहिल्या विजयानंतर विश्रांती घेऊ नका, कारण दुसऱ्या युद्धात जर तुम्ही पराभूत झालात तर “पहिला विजय हा केवळ एक योगायोग होता” अनेक लोक हेच म्हणण्याच्या तयारीत असतात.

 • कोणतेही ध्येय यशस्वीपणे गाठायचे असेल तर त्या ध्येयाशी तुमची कमालीची एकनिष्ठता असावी लागते, सगळे प्रयत्न त्या एकाच दिशेने वळवावे लागतात.

 • आयुष्यात कधीही तुम्ही अपयशी म्हणजे FAIL झालात तर हार मानू नका, कारण FAIL या शब्दाचा अर्थ “FIRST ATTEMPT IN LEARNING” असा होतो.

 • आपल्या सगळ्यांकडे सारखेच टॅलेंट नसते आणि ते असणे आवश्यकही नसते, पण आपल्या सगळ्यांकडे ते टॅलेंट जोपासून, त्याला वाढवण्याच्या संधी मात्र सारख्याच असतात.

 • दुसऱ्याला पराभूत करणे तर फार सोपे आहे. कठीण तर दुसऱ्याचे मन जिंकणे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने