“हा सर्व फालतूपणा…” ‘ब्रह्मास्त्र २’साठी KGF स्टार यशला कास्ट केल्याच्या चर्चांवर करण जोहरने सोडलं मौन

मुंबई: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. आगामी काळात या चित्रपटाचे आणखी २ भाग येणार आहेत. यापैकी ‘ब्रह्मास्त्र २’ची घोषणा झाली आहे. त्यानंतर या चित्रपटाच्या कास्टिंगची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटात बॉलिवूड कलाकारांना डालवून केजीएफ फेम दाक्षिणात्य सुपरस्टार यशला संधी देण्यात आल्याचं बोललं जात होतं. पण आता आता यावर निर्माता करण जोहरने मौन सोडलं आहे.

‘ई-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत करण जोहरने दाक्षिणात्य सुपरस्टार यशचं ‘ब्रह्मास्त्र २’साठी कास्टिंग झाल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘ब्रह्मास्त्र २’मध्ये देव ही सर्वात महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे. ज्याची कथा पुढच्या भागात दाखवली जाणार आहे. देव आणि त्याची पत्नी अमृता याची पुसटशी झलक पहिल्या भागात दिसली होती. त्यामुळे पुढील भागात हे पात्र खूप महत्त्वाचं असणार आहे. जेव्हा करणला याच्या स्टारकास्टबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला, “हा सर्व फालतूपणा आहे. आम्ही अद्याप कोणाशीच संपर्क केलेला नाही.”अयान मुखर्जीच्या चित्रपटातील देवच्या भूमिकेसाठी यशच्या आधी आणखी दोन नावं चर्चेत आहेत. दीपिका पदुकोण अमृताच्या भूमिकेत असणार असल्याचे बोलले जात असल्याने पहिलं नाव रणवीर सिंगचं घेतलं जात आहे. तर रणवीर व्यतिरिक्त हृतिक रोशनचंही नाव या भूमिकेसाठी चर्चेत आहे. हृतिकला निर्मात्यांची पहिली पसंती असल्याचंही बोललं जात आहे. मात्र, ‘क्रिश ४’ मुळे, तो ‘ब्रह्मास्त्र२’चा भाग होऊ शकणार नाही अशाही चर्चा आहेत.‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाबद्दल बोलायचं झाले तर, हा चित्रपट ९ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. आता ४ नोव्हेंबरला तो डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट, नागार्जुन, अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय यांच्या मुख्य भूमिका होत्या. तर शाहरुख खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिके दिसला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने